उघडले एक चंदनी दार
उजेड दिसतो आत केशरी, सोन्याचा संसार
मांडवात मी सहज चालले
धन्यासंगती सात पाऊले
येता येता कुठे पोचले
घर कसले हे ? धरणीवरती स्वर्गाचा अवतार
वस्तू वस्तू इथे देखणी
दौलत भरते सदैव पाणी
या घरची मी झाले राणी
कुण्या जन्मीच्या पुण्याईने आला हा अधिकार
नवस करुनिया कुठल्या देवा
असा सुखाचा लाभे ठेवा
वडिल-माउली यांना ठावा
सुखातही या येतो आठव त्यांचा वारंवार
No comments:
Post a Comment