ओटीत घातली मुलगी,Otit Ghatali Mulagi

ओटीत घातली मुलगी विहिणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी पायी

वधुमाय तुम्ही ही तुम्हा सारे ठावे

वाटते तरीही आर्जवूनी सांगावे
मी पदर पसरते जन्मदायिनी आई

माहेर आपुले सत्पुरुषांच्या वंशी
सासरी वाढत्या सतत सुखांच्या राशी
पाठिशी आपुल्या नित्य उभी पुण्याई

लाडकी लेक ही माझी पहिली वहिली
भाग्येच तियेच्या सून आपुली झाली
तुम्हीच यापुढे तिजसी माझ्या ठायी