कुणीही पाय नका वाजवू,Kunihi Paay Naka Vajavu

कुणीही पाय नका वाजवू, पाय नका वाजवू
चाहूल देउन नका कुणी ग चिमण्याला जागवू

नकोस चंद्रा येऊ पुढती, थांब जरासा क्षितीजावरती
चमचमणारे ते चंदेरी चाळ नको नादवू

पुष्करणीतून गडे हळूहळू, जललहरी तू नको झुळझुळू
नकोस वाऱ्या फुलवेलींना, फुंकरीने डोलवू

नकोस मैने तोल सावरू, नकोस कपिले अशी हंबरू

यक्ष-पऱ्यांनो स्वप्नी नाचून नीज नका चाळवू

जगावेगळा छंद ग याचा, पाळण्यांतही खेळायाचा
राजी नसता अखेर थकुनी पंख मिटे पाखरू