कुणाला सांगू माझी व्यथा,Kunala Sangu Majhi Vyatha

कुणाला सांगू माझी व्यथा ?
प्राजक्ताच्या प्रासादावर पडली विद्युल्लता !

प्रलयाचे हे भीषण तांडव, डळमळला गगनाचा मांडव
थरथरत्या पृथ्वीवर नाचे तिमिरदैत्य एकटा !

कशास घडल्या अपुल्या भेटी, कशास जडली वेडी प्रीति
मीलन अपुले ठरली आता स्वप्नामधली कथा !

कोण निवारील घोर अनर्था, तूच प्राण तू जीवन पार्था

ये विझवाया हा दावानल शिंपाया अमृता !

No comments:

Post a Comment