कोण तुजसम सांग,Kon Tujsam Sang

कोण तुजसम सांग गुरुराया । कैवारी सदया ।
पाहिजे तें अंगी स्वीकाराया । भवदुःख हराया ॥


तूंचि विष्णु, तूंचि शिव, तूं धाता । तूं विश्वंभरता ।
तूंचि व्यापकव्याप्यातें प्रसवीता । तूं मायेपरता ॥

तूंचि शिष्या पोसणारी माता । तूं विद्यादाता ।
तूंचि देशी तत्वनिधी निजहाता । तारक बलवंता ॥

No comments:

Post a Comment