आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारू !
हिरवी श्यामल भवती शेती
पाउलवाटा अंगणि मिळती
लव फुलवंती, जुइ शेवंती
शेंदरि अंबा सजे मोहरू !
चौकट तीवर बाल गणपती
चौसोपी खण स्वागत करती
झोपाळ्यावर अभंग कातर
सवे लागती कड्या करकरू !
माजघरातिल उजेड मिणमिण
वृद्ध कंकणे करिती किणकिण
किणकिणती हळु, ये कुरवाळू
दूर देशिचे प्रौढ लेकरू !
No comments:
Post a Comment