काडकीच्या टोकावर ताणलाय दोर
दावतोय करामत इवलासा पोर
न्हाई नजर ठरणार वरी, खेळ डोंबारी करी
कशी कसरत दावतोय न्यारी, खेळ डोंबारी करी
दुमडुन एक केली पोट आणि पाठ
जल्माची घातलीया मरणाशी गाठ
जीव लाखाचा फेकलाय वरी
कशी कसरत दावतोय न्यारी, खेळ डोंबारी करी
शेलाट्या अंगाची घातलीया घडी
लव लव लवतिया वेताची छडी
फूल डवरतं फुललंय् दारी
कशी कसरत दावतोय न्यारी, खेळ डोंबारी करी
घडीत आभाळ घडीत धरती
कोरभर भाकर पोटाला पुरती
दान पघावती रानातली दरी
कशी कसरत दावतोय न्यारी, खेळ डोंबारी करी
No comments:
Post a Comment