कानात सांग माझ्या, मी आवडे तुला का?
माझी अबोल प्रीति नयनां तुझ्या कळे का?
नयनांत माझिया हे मंदीर यौवनाचे
मी न्याहळून बघते मूर्तीत रूप तव ते
फूलमाळ गुंफलेली कंठी तुझ्या पडे का?
मी ज्योत प्रीतीची ही जळते तुझ्याचसाठी
होऊन तू पतंग घे झेप भेटीसाठी
सद्भाग्य हे सुखाचे नशिबी तरी असे का?
मी बासरी परी त्या ओठी तुझ्या रहावे
सूरासवे सुगंधी धुंदीत गात जावे
हे स्वप्न अंतरीचे होईल पूर्ण कधी का?
No comments:
Post a Comment