कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला
तुम्ही गेला आणिक, तुमच्या देवपण नावा आले
सप्तस्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले
गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले !
तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला
सूर्य, चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात
कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात
पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा
No comments:
Post a Comment