कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज ।
वर्म दावीं मज याचकासी ॥१॥
कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा ।
कोण्या भावें देवा आतुडसी ॥२॥
कैसी कीर्ती वाणूं कैसा लक्षा आणूं ।
जाणूं हा कवण कैसा तुज ॥२॥
कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चित्ती ।
कैसी स्थिती मती दावी मज ॥३॥
तुका म्हणे जैसें दास केले देवा ।
तैसें हें अनुभवा आणीं मज ॥४॥
No comments:
Post a Comment