गोकुळिचा राजा माझा,Gokulicha Raja Majha

गोकुळिचा राजा, माझा गोकुळिचा राजा

देवकिनंदन श्याम सुलोचन
गोपगड्यांसह खेळे हासुन
लेवुनि पानफुलांच्या साजा

वाम बाहुवर कपोल डावा
अधरि आडवा धरला पावा
मोहन कुंजविहारी माझा


यमुनातीरी उभ्या गौळणी
रूप घेति ते नयनी भरुनी
सोडुनि जलभरणाच्या काजा

No comments:

Post a Comment