गंगा आली रे अंगणी,Ganga Aali Re Angani

गंगा आली रे अंगणी

बारा महिने तेरा काळ
रानोमाळी सुगी सुकाळ
चतुरपणाने करा गड्यांनो,

चतुरपणाने करा जळाच्या पाटाची आखणी

भूमिवरच्या भागीरथीला
स्वर्गंगेचा ओघ मिळाला
ऐसे महात्म्य गंगेचे
पाणी, पाणी, जिकडे-तिकडे, सौख्याची श्रावणी

सुंबरानं मांडिलं गा बिरूबा या देवाचं
आबाळाच्या पित्याचं गा धरीतरी मातेचं

पिकून पिवळी झाली घाटं
घुमवा भलरी भल्या पहाटं
भलरी भलरी भलरी दादा भलगडी दादा
करा कापणी, काढा दौलत, साधा ही पर्वणी

यंत्र चालवा गाळा ऊस
अमाप पिकला घ्या कापूस
वेचा कापूस वेचा ग वेचा कापूस वेचा
दूध विकाया पुन्हा निघाल्या, गोकुळच्या गौळणी

युग यंत्राचे आले रे, अवघड सोपे झाले रे
घाम न आता पडो कुणाचा, कोठे निष्कारणी

दळिद्र गेले पळुनि पार

फळाफुलांना आला बहार
नांदायाते येई लक्ष्मी, स्वर्गीची पाहुणी

गंगा आली, लक्ष्मी आली अंगणी

No comments:

Post a Comment