गगना गंध आला,Gagana Gandh Aala

गगना गंध आला
मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी
जळत्या ज्वाला
मधुमास धुंद झाला !


आले वनावनात
सहकार मोहरून
भ्रमरास मंजिरीची
चाहूल ये दुरून
भरला मरंद कोषी
भरला प्याला

मधुमास धुंद झाला !

वेलीस अंकुरांची
वलये किती सुरेख !
लिहितात अंगुलींनी
वाऱ्यांत प्रेमलेख

संदेश प्रेमिकांना
दुरुनी आला
मधुमास धुंद झाला !

अभिमान सांडुनीया
अनुराग सज्ज झाला
अभिसारिका निघाल्या
भेटावया प्रियाला
का मीनकेतना ही
करिसी लीला ?
मधुमास धुंद झाला !

No comments:

Post a Comment