एकतारि गाते गीत विठ्ठलाचे,Ektari Gate Geet Vitthalache

एकतारि गाते,
गाते गीत विठ्ठलाचे
वाळवंटी ध्वजा,
ध्वजा वैष्णवांची नाचे

मराठीचा बोल,
बोल जगी अमृताचा
ज्ञनियांचा देव,
देव ज्ञानदेव नाचे

नाचे चोखामेळा,
मेळा नाचे वैष्णवांचा
नाचे नामदेव,
देव किर्तनात नाचे

अनाथांचे नाथ
नाथ माझे दीनानाथ
भाग्यवंत संत,
संत रूप अनंताचेNo comments:

Post a Comment