एकटी मी एकटी,Ekati Mi Ekati

एकटी मी एकटी, एकटी मी एकटी
संचिताचे खेळ सारे दुष्ट दैवाची गती

शांतवू केवि मनाला, हाक मी मारू कुणाला
भाग्य होता पाठमोरे आप्त-बंधू पांगती

भंग झाला भावनांचा, रंग गेला जीवनाचा
हास्य लोपे लोचनांचे अश्रूधारा वाहती

आग पेटे भोवताली स्वप्नपुष्पे दग्ध झाली
मृत्यूही होई न माझा सोबती या संकटी

No comments:

Post a Comment