एक फुलले फूल आणि,Ek Phulale Phool Aani

एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले

मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना, मुळि तयाला नटुनथटुनी लाजणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणिसे मोहिले


त्या 'कुणा'ला काय ठावे, या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला, वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली, दुरुन त्याची पाऊले

एक दुसरे फूल त्याने, खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले, भाव उभरे आतले

करपली वेडी अबोली, दुःख देठी राहिले

No comments:

Post a Comment