अरे अरे ज्ञाना झालासी,Are Are Dnyana Jhalasi

अरे अरे ज्ञाना झालासी पावन ।
तुजें तुज ध्यान कळों आले ॥१॥

तुझा तूं चि देव तुझा तूं चि भाव ।
फिटला संदेह अन्यतत्वी ॥२॥

मुरडूनियां मन उपजलासी चित्तें ।
कोठें तुज रितें न दिसे रया ॥३॥

दीपकीं दीपक मावळल्या ज्योती ।
घरभरी वाती शून्य झाल्या ॥४॥

वृत्ती चि निवृत्ति अपणांसकट ।

अवघेंची वैकुंठ चतुर्भूज ॥५॥

निवृत्ति परमानुभव नेमा ।
शांतिपूर्ण क्षमा ज्ञानदेवो ॥६॥No comments:

Post a Comment