आधी गणाला रणी आणला
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना
धन्य शारदा ब्रम्ह नायका, घेऊन येईल रूद्रविणा
साही शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा, दाविल यंत्र खुणाखुणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना
सद्गुरू माझा स्वामी जगद्गुरू, मेरूवरचा धुरू आणा आणा
ब्रम्हांडा भवता तो एक सवता, दिवाच लाविल म्हणा म्हणा
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना
माझ्या मनाचा मी तू पणाचा, जाळून केला चुना चुना
पठ्ठेबापूराव कवि कवनाचा, हा एक तुकडा जुना जुना
नाहीतर रंग पुन्हा सुना सुना
No comments:
Post a Comment