आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको

आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको
कालचे वेड्या फुलांचे, रंग तू मागू नको

सांजता चाफ्याकळीचे चुटपुटीचे भेटणे
पानजाळीतून झिरपे, बावरेसे चांदणे
त्या क्षणांचे, चांदण्यांचे स्पर्श तू मागू नको

पाकळयांचे शब्द होती, तू हळू निश्वासता
वाजती गात्री सतारी, नेत्रपाती झाकता
त्या फुलांचे, त्या स्वरांचे, गीत तू मागू नको

रोखूनी पलकांत पाणी, घाव सारे साहीले
अन सुखाच्या आसवांचे, मीठ डोळा साचले
या घडीला मोतियाचा घास तू मागू नको

काय बोलू श्वासभारे चांदणे डहूळेल का ?
उमलण्याचे सुख फिरुनी, या फुला सोसेल का ?
नीत नवी मरणे मराया, जन्म तू मागू नको


S - Sudheer Phadke
M - Yeshwant Deo

S - सुधीर फडके
M - यशवंत देव

No comments:

Post a Comment