झोंबती अंगा जललहरी - अन्नपूर्णा (१९६८)






झोंबती अंगा जललहरी
आमुची वसने दे श्रीहरी !

पळे पळली गेली घटका
पुरे खेळ हा अवखळ, लटका
परत जाऊ दे घरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

जात आमुची अशी लाजरी
क्षणाक्षणाने पदर सावरी
सुवेश असला तरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

जळात बुडले देह तरी हे
उघडेपण मन विसरत नाही
लाज सले अंतरी -
आमुची वसने दे श्रीहरी !

किती विनवावे किती रडवावे
असेच वाटे जळी बुडावे
तूच सुबुद्धी धरी -
आमुची वसने दे श्रीहरी !





















गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - स्नेहल भाटकर
स्वर - सुमन कल्याणपूर
चित्रपट - अन्नपूर्णा (१९६८)
राग - ललत (संगीत यात्रा)

No comments:

Post a Comment