अरूपास पाहे रूपी तोच Arupasi Pahe Rupi

अरूपास पाहे रूपी तोच भाग्यवंत
निसर्गात भरूनी राहे अनादी अनंत

कधी पावसाच्या धारा
भणाणता केव्हा वारा
पहाटेस होऊन तारा
हसे रूपवंत

ग्रीष्म रक्त पेटविणारा
शिशिर आग गोठविणारा
मनोगते मिळविणारा
फुलारी वसंत

कुशीमध्ये त्याच्या जावे
मिठीमध्ये त्याला घ्यावे
शाश्वतात विरूनी जावे
सर्व नाशवंत


L - सुधीर मोघे,
M - राम फाटक,
S - श्रीकांत पारगावकर

1 comment:

  1. सबसे बडा रुपैया

    रुपयास म्हणती “रुपी” आंग्ल संत
    तिजोर्‍या जयाच्या भरुनी राहती लक्ष्मीवंत

    अविरत त्याच्या धारा
    पडती अंगणी तास बारा
    पहा वरी नभी रात्री, तारा
    लुकलुके शोभिवंत !

    थंड रक्त उबवणारा
    उष्ण रक्त शमवणारा
    मनोगते पुरवणारा
    दुलारी महंत !

    कुशीमधे त्याला घ्यावे
    उशीमधे त्याला भरावे
    झोपेत प्रेमे कुरवळावे;
    वित्त बळवंत !

    ReplyDelete