अरसिक किती हा शेला Arasik Kiti Ha Shela

अरसिक किती हा शेला ।
त्या सुंदर तनुला सोडूनि आला ॥

प्रेमें प्राणपतीला । मी संतोषें हा अर्पण केला ।
दुर्मिळ जें स्थळ मजला । तें सहज मिळुनि या दुर्भाग्याला ।
तेथुनि कां हा ढळला । त्या सत्संगतिला कैसा विटला ।
कोंडुन ठेविन याला । मज दृष्टिस नलगे निष्ठुर मेला ॥


L - अण्णासाहेब किर्लोस्कर
M - अण्णासाहेब किर्लोस्कर
S - बालगंधर्व
नाटक - M सौभद्र (१८८२)

No comments:

Post a Comment