अमृताची गोडी तुझ्या भजनात Amrutachi Godi Tujhya Bhajanat

अमृताची गोडी तुझ्या भजनात
मनाचा विसावा दु:खी जीवनात

भजनी रंगावे, जग विसरावे
राम-नाम घ्यावे चिपळ्यांची साथ

माझा पांडुरंग ऐकतो अभंग
भक्तितरंगी दंग नाचे कीर्तनात

नाम तुझे देवा, केशवा माधवा
कोणतेही ठेवा, गोडवा तयात


L - योगेश्वर अभ्यंकर,
M - बाळ माटे,
S - माणिक वर्मा

No comments:

Post a Comment