अबोल झालीस का साजणी Abol Jhalis Kaay Sajani

अबोल झालीस का, साजणी ?
आज जिवांची जुळली गाणी

मुक्या कळीला शिवे पाखरू
नकोस आता सुगंध चोरू
पहा मजकडे, उघड पापणी

बाग धुंडिली मी तुजसाठी
लाभलीस मज सखे शेवटी
हास मोकळे, गे मधुराणी

दास तुझा मी नव्हे सोबती
गुंगत राहिन तुझ्याभोवती
तहान तू मज, तूचि पाणी


L - ग. दि. माडगूळकर,
M - राम कदम,
S - महेंद्र कपूर,
 वैभव (१९६०)

No comments:

Post a Comment