सूर्य डोईवर जळणारा SURYA DOIWAR JALANARA

सूर्य डोईवर जळणारा, चांदराती झगमगणारा
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना.. सखया तुझ्याविना..

पश्चिमवेलीवरती फुलल्या रंगफुलांच्या माला
पौर्णिमेतुनी पहा पसरल्या शीतल मोहक ज्वाला
सार्‍यातुन विरघळताना, आत आत मोहरताना
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना.. सखया तुझ्याविना..

भान हरपुनी पाय थबकले एका जागी आता
माझ्या पुढती धावत सुटल्या अदृष्याच्या वाटा
वाटा हिरव्या हसणार्‍या, जरि क्षितिजाशी पळणार्‍या
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना.. सखया तुझ्याविना..


Lyrics -संदीप खरे SANDEEP KHARE
Music -सलील कुलकर्णी SALIL KULKARNI
Singer -बेला शेंडे  BELA SHENDE
Movie / Natak / Album -हृदयातले गाणे HRUDAYATALE GANE

No comments:

Post a Comment