सांग सख्या रे SANG SAKHYA RE

सांग सख्या रे सांग सख्या रे आहे का ती अजून ताईशीच गर्द राईपरी (२)

सांग सख्या रे सांग सख्या रे अजून का डोळ्यातून तिचीया झुलते अंबर
सांग सख्या रे अजून का डोळ्यातून तिचीया झुलते अंबर
सांग अजूनही निजे भोवती तिच्या रातराणीचे अस्तर
सांग अजूनही तशीच का ती अस्मानीच्या निळाइपरी

सांग सख्या रे आहे का ती अजून ताईशीच गर्द राईपरी

फुले स्पर्शता येते का रे अजून बोटांमधून थरथर
तिच्या स्वरांनी होते का रे सांज अवेळी अजून कातर
अजूनही ती घुमते का रे अजूनही ती घुमते का रे वेळू मधल्या धुंद शिळेपरी

सांग सख्या रे आहे का ती अजून ताईशीच गर्द राईपरी (२)

वयास वळणावरं नेणारा घाट तिचा तो अजुना का रे
सलज्ज हिरव्या कविते जैसा थाट तिचा तो अजुन का रे
अजून का ती जाळत जाते अजून का ती जाळत जाते रान कोवळे जणू वणव्यापरी

सांग सख्या रे आहे का ती अजून ताईशीच गर्द राईपरी

सांग जशी ती मिटली होती जरा स्पर्शता लाजाळू परी (२)
आणिक उमाटून गेली होती लाली अवघ्या तारुण्या वरी
तिने ठेवला आहे का रे जपून क्षण तो मोरपिसा परी

सांग सख्या रे आहे का ती अजून ताईशीच गर्द राईपरी

आता बोलणे आणि वागणे यातील फराका इतुके अंतर पडले तरीही जाणवते मजं कविते मधूनी तिचीच थरथर
सांग तिला मी आठवतो का सांग तिला मी आठवतो का तीजवर रचलेल्या कविते परी

सांग सख्या रे आहे का ती अजून ताईशीच गर्द राईपरी

Lyrics -संदीप खरे SANDIP KHARE
Music - सलिल कुलकर्णी SALIL KULKARNI
Singer -सलिल कुलकर्णी SALIL KULKARNI
Movie / Natak / Album -सांग सख्या रे SANG SAKHYA RE 

No comments:

Post a Comment