हे कधी होईल HE KADHI HOIL

हे कधी होईल का?
करपलेल्या वल्लरीला पालवी येईल का ?

शिंपतो चैतन्य वारा, श्रावणाच्या धुंद धारा
वाळलेले अंग नवख्या अंकुरा लेईल का?

गळून गेली सर्व पाने, मिसळले मातीत सोने
माणकांची देणगी ही मेदिनी देईल का ?


Lyrics -ग. दि. माडगूळकर G.D.MADAGULAKAR
Music -दत्ता डावजेकर DATTA DAWAJEKAR
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -सुखाची सावली SUKHACHI SAWALI

No comments:

Post a Comment