CHAND KEWADYACHI RAT

चांद केवडयाची रात, आलीया सामोरा
राजा माझ्या अंबाडयाला बांधावा गजरा
तुझ्या गाण्यानं वेढलं शाहीरा, माझं जीवन आलया मोहोरा

तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहीरा, मन वादळवार्‍यांत भोवरा

शुभ्र काचेत पारा, तसा संग साजुरा
हिरव्या आषाढ वनात डांगोरा, कसा पाण्यात लाविला अंगारा

जरा बांध गजरा, माझी आण शाहीरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा


Lyrics -ना. धो. महानोर N.D.MAHNOR
Music -पं. हृदयनाथ मंगेशकर, PANDIT. HRUDAYANATH MANGAESHAKAR
Singer -लता मंगेशकर LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -गीत  GEET

No comments:

Post a Comment