चुलीवरची खीर chulivarchi kheer

चुलीवरची खीर एकदा पुरीला हसली
कढईतली पुरी मग गुरफटून बसली
काही केल्या फुलेना, जरा सुद्धा फुलेना
झाऱ्यानं टोचलं, ते ही तिला बोचलं
अशी थट्टा पुरीच्या काळजाला डसली

पुरी झाली लाल, तिचे फुगले गाल
मन आले भरू, डोळे लागले झरू
तिथून उठून तरातरा ताटात जाऊन बसली

खीर थंड झाली, वाटीत बसून आली
लाडे लाडे खीर मग पुरीजवळ गेली
पुरीताई पुरीताई बघ जरा इकडे
माझे म्हणणे ऐक गडे… पण अ हं
चार शब्द ऐकेल तर पुरी ती कसली

तिकडून ताई आली, तिने युक्ती केली
खिरीची नि पुरीची खुप गट्टी झाली
तेव्हा पासून त्यांची जोडी पक्की होऊन बसली
कढईतली पुरी मग कधी नाही रुसली

Music -प्रज्ञा खांडेकर PRADANYA KHANDEKAR
Singer -प्रज्ञा खांडेकर PRADANYA KHANDEKAR
Movie / Natak / Album - गीत GEET

No comments:

Post a Comment