बकुळफुला, कधीची तुला BAKULFULA ,KADHICHI TULA

सात जन्मांची निनावी आशा धरून मनात
बकुळफुला, कधीची तुला धुंडते वनात

टाकून दूर नदीचा पार, उघडे माझ्या घराचे दार
सदैव पीशी, हिंडते अशी, नि:संगपणात

टाकून सारा शृंगारसाज, तुझ्याचसाठी फिरते आज
होईल कसे ? झाले रे हसे, सगळ्या जनात !

श्रावणघनगर्जन वाजे, दिपव दोन्ही नयन माझे
एका आंधळ्या, गहन निळ्या, सोनेरी क्षणात


Lyrics -ना. घ. देशपांडे NA.GH.DESHPANDE
Music - यशवंत देव YASHWANT DEV
Singer -मंगला नाथ MANGALA NTH
Movie / Natak / Album -गीत GEET 

2 comments: