अप्सरा स्वर्गातुन आली APASARA SWARATUN AALI

इंद्रधनूच्या कमानीतुनी अवतरली खाली
अप्सरा स्वर्गातुन आली

पदन्यास हे झंकाराचे
कोरिव लेणे शृंगाराचे
जणू सांज ही रविकिरणांच्या तेजाने न्हाली

जलवंतीच्या निळ्या दर्पणी
न्याहळसी का तनू देखणी ?
नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली ?

अनेक रूपी, अनेक रंगी
भासलीस तू सखे शुभांगी
स्वप्‍नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली

Lyrics -जगदीश खेबूडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -बाळ पळसुले BAL PALASULE
Singer -महेंद्र कपूर MAHENDR KAPOOR
Movie / Natak / Album - पाटलीण PATALIN

No comments:

Post a Comment