स्वर्ग हा नवा SWARG HA NAVA

)

स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा

ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा

चिमणे घरटे सजले साजरे, इवले सुख हे फुलले आज रे
भरले घर हे आनंदाने, मन हे गाते गीत तुझे ऐक ना
प्रेम गीत छेडीतो उरात पारवा
ऐक साजणी ह्या खुळ्या क्षणी
वेड लावतो जीवा तुझाच गोडवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा

बघुनी अपुले घर स्वप्नातले
सजणी झुलले तनमन नाचले
जुळली नाती दोन जीवांचे
जीव हे झाले एकरूप  साजणा

साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा वाटतो हवा
साथ ही तुझी जणू उन्हात चांदवा
स्वर्ग हा नवा

Lyrics -गुरु ठाकूर GURU THAKUR
Music -अजय - अतुल AJAY- ATUL
Singer -योगिता गोडबोले - हृषिकेश रानडे YOGITA GODABOLE-HRISHIKESH RANADE
Movie / Natak / Album -तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं TUZYA MAZYA SANSARALA ANI KAY HAW

No comments:

Post a Comment