सखि भावगीत SAKHI BHAVGEET

सखि भावगीत माझे तुजसाठी गायिले

तू नाहि ऐकियले

हृदयात वेदनांची सरिता अखंड आहे

तीरी तिच्या बसोनी तुजसाठी गुंफियले

तू नाहि ऐकियले

गेले सखे विरोनी ते गीत अंतराळी

परि त्याचिया स्मृतीने होतात नेत्र ओले

तू नाहि पाहियले


Lyrics -पंडितराव नगरकर  PANDITRAW NAGARAKAR
Movie / Natak / Album -संगीत देहूरोड SANGIT DEHUROAD

No comments:

Post a Comment