माझ्या मना आता पुन्हा MAZYA MANA AATA PUNHA

माझ्या मना आता पुन्हा
शोधु नको भरती जुनी, लाटा जुन्या
जोडू नको तुटला दुवा
मागू नको मिटल्या खुणा
एकटा मी, एकटे मन, एकटी स्पंदने
स्वप्न आले, स्वप्न गेले, स्वप्न झाले जुने
सारे सुने …

आता इथे तो चांदवा
ते नाही चांदणे
आता इथे राती सुन्या
माझे हे सुने जागणे
थोडे थोडे शब्द झाले सुटे
थोडे थोडे अर्थ झाले  रिते

तुटली तार का झंकारते
नाते का असे रेंगाळते
शपथा कोरड्या झाल्या तरी
अजुनी ओल का रहाते
वेगळी जाहली दोन्ही ही मने
राहिली का तरी सोबती बंधने

Lyrics -वैभव जोशी VAIBHAV JOSHI
Music -अजय नाईकAJAY NAIK
Singer -शंकर महादेवन SHANKAR MAHADEWAN
Movie / Natak / Album -लग्न पहावे करून २०१३ LAGN PAHAVE KARUN

No comments:

Post a Comment