झाडाखाली बसलेले JHADAKHALI BASALELE



त्याला पाऊस आवडत नाही, तिला आवडतो
ढग दाटून आल्यावर तो ,तिच्या तावडीत सापडतो
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही
असल तुझ गणित खरच  मला कळत
पाऊस म्हणजे चिखल सारा ,पाऊस  म्हणजे मरगळ
पाऊस म्हणजे गार वारा ,पाऊस म्हणजे हिरवळ
पाऊस कपडे ख़राब करतो ,पाऊस वैतागवाड़ी
पाऊस म्हणजे भीजरी पायवाट,पाऊस म्हणजे झाड़ी 
पाऊस  रेंगाळलेली काम ,पाऊस म्हणजे  सुट्टी उगाच
पावसामधे मध्ये गुपचुप निसटून मन जाऊन बसत ढगात
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होत
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होत
पावसावरुण भांडण होऊन लोकामधे हस होत 
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पावसा सकट आवडावी ती म्हणून तिहि झगड़ते 
रुसून मग ती निघुन जाते भीजत राहते पावसात
रुसून मग ती निघुन जाते भीजत राहते पावसात
त्याच तीच भांडण अस ओल्या चिंब पावसात 


झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले


काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले

Lyrics -सौमित्र SAUMITR
Music -मिलिंद इंगळे MILIND INGALE
Singer -मिलींद इंगळे MILIND INGALE
Movie / Natak / Album -गारवा GARAWA 

No comments:

Post a Comment