हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली
ओल्या दवांत न्हाली
हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली
ओल्या दवांत न्हाली,
तारे निळया नभांत, हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा, खुलत्या नव्या कळीत
तारे निळया नभांत, हे गूज सांगतात
का रंग वेगळा हा, खुलत्या नव्या कळीत
ओठांतल्या स्वरांना
ओठांतल्या स्वरांना, का जाग आज आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली
ओल्या दवांत न्हाली
तो स्पर्श चंदनाचा, की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला, स्वप्नातल्या स्वरांचा
तो स्पर्श चंदनाचा, की गंध यौवनाचा
उधळीत रंग आला, स्वप्नातल्या स्वरांचा
ही रात्र धूंद होती, स्वप्नात दंगलेली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली
ओल्या दवांत न्हाली,
हे चांदणे फुलांनी, शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी, ओल्या दवांत न्हाली
ओल्या दवांत न्हाली
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAVAL
Movie / Natak / Album -गीत GEET
No comments:
Post a Comment