गणनायका GANANAYAKA

गणनायका, शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा

सह्याद्रीच्या हृदयामध्ये, लेण्याद्रीच्या या मंदिरा


शिवनेरीच्या शिवशंभूचा सहवास पावन लाभला

सुकडीतीरी तव मंदिरी हो पुण्यसंचय हा भला

गिरीजात्मजा तव मूर्ती ही सिंदूरचर्चित सुंदरा


तोडूनिया भवपाश हे भवकाळ त्या गुंफातुनी

तपी बैसले, बहु कष्टले का व्यर्थ ते योगीमुनी

भक्ती तुझी सुखदायिनी, तप का उगा मग आचरा

गणनायका, शुभदायका यावे तुम्ही गिरीकंदरा


Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET

No comments:

Post a Comment