रानच्या पाखरा रे RANICHYA PAKHARA RE


रानच्या पाखरा  रे,उगीच भेट झाली

वहात  होते पाणी,झरयातधुंद गाणी
फुलात गंध होता,गंधात भेट झाली

प्रीतीचा धुंद भाषा,लाविते गोड आशा
मोकळ्या आभाळाची,तुला रे हाक आली

विरही उरे हे सुर,पाखरू गेले दूर
एकटी उभी येथ,झुरत झाड़ा खाली

रानच्या पाखरा  रे,उगीच भेट झाली


Lyrics-मंगेश पड़गावकर
Music -पं. हृदयनाथ मंगेशकर
Singer -उषा मंगेशकर
Movie / Natak / Album -बन्याबापु 

No comments:

Post a Comment