मन आज न माझे राहिले,सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरले ,हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे ,उधळून कुठे हे गेले
प्रेमाचे नाव देऊन नाव ठाव ,फसवून कुठे हे गेले
मन आज न माझे राहिले,सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरले ,हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे ,उधळून कुठे हे गेले
प्रेमाचे नाव देऊन नाव ठाव ,फसवून कुठे ते गेले
मन आज न माझे राहिले राहिले राहिले
थांबून वाट बघतो कधी
सांगुन वाट चुकतो कधी
सांगून रात्र फिरतो कधी
का आठवून हसतो कधी
मन पाखरू प्रेमात धुंद ,बेभान आज भिरभिरते
किती सावरू किती आवरू प्रेमाच्या गौर्य मन फिरते
हृदयाचे स्पंदने मायेने स्पर्शुन कुठे हे गेले
प्रेमाचे नाव देऊन नाव ठाव ,फसवून कुठे ते गेले
मन आज न माझे राहिले,सोडून कुठे गेले
एक मी, एक तू,एक प्रेम कधी जुळले ,जे नाते कळले न कधी
माझ्यात प्रेम, प्रेमात मी घडले,जे आज घडले न कधी
मन गुंतले ,नभ रंगले ,प्रेमाने हे जीवन सजले
स्वप्नात मी ,जे शोधिले या क्षणात मनात मनात रुजले
जन्मोजन्मीची बंधने ,जोडून कुठे ते गेले
प्रेमाचे नाव देऊन नाव ठाव ,फसवून कुठे हे गेले
मन आज न माझे राहिले,सोडून कुठे गेले
शोधून मला मी हरलो ,हरवून कुठे गेले
प्रीतीचे सारे रंग नवे ,उधळून कुठे हे गेले
प्रेमाचे नाव देऊन नाव ठाव ,फसवून कुठे हे गेले
मन आज न माझे राहिले,सोडून कुठे गेले
Music -रोहन प्रधान ROHAN PRADHAN
Singer -रमन RAMAN
Movie / Natak / Album -डावपेच DAVAPECH
Lyrics -
Music -
Singer -
Movie / Natak / Album -
No comments:
Post a Comment