एक दोन तीन !
माणुसकीचे पाईक आम्ही असे वारसा हा प्राचीन !
सज्जन त्यांचे आम्ही साथी, ब्रीद सांगते निधडी छाती
त्यांच्यासाठी धावुन जाऊ मरणहि माथा झेलून घेऊ
भला तयाला धरू उराशी उच्च असो वा अनाथ दीन !
एक दोन तीन !
माणुसकीचे केवळ लांछन दुर्जन तो तो अमुचा दुष्मन
निर्भयतेने गर्जत 'हर हर' संगर त्याशी करू भयंकर
दुष्ट तयाचे दमन करावे मार्ग नसे हा अम्हां नवीन !
एक दोन तीन !
एक जाणतो आम्ही प्रीति- तोच वेद, ती गाथा, पोथी;
मंगल पावन प्रीतीसाठी विष हो अमृत अमुच्या ओठी
या प्रीतीच्या चरणांवरती विश्व होतसे अवघे लीन !
एक दोन तीन !
Lyrics -Shanta Shelke. शान्ता शेळके
Music -N,Datta. एन्. दत्ता
Singer -महेंद्र कपूर Mahendra Kapoor,सी.रामचंद्र C.Ramchandra
Movie / Natak / Album -EK DON TIN

No comments:
Post a Comment