हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी
आरास ही तार्यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अशा वेळी मज याद तुझी आली, ये ना
मोहरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी, रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू
वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे
नाव तुझे माझ्या ओठावर येते
फूल जसे की फुलताना दरवळते
इतके मज कळते, अधुरा मी येथे
चांदरात ही बघ निसटून जाते
बांधिन गगनास झुला
जर देशील साथ मला, ये ना……मोहरत्या …
हे क्षण हळवे, एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी, रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे
बिलगुनिया तू मजला ते ऐकावे
होऊन कारंजे उसळे मन माझे
पाऊल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला
दे आता हाक मला, ये ना……मोहरत्या …
Lyrics - चंद्रशेखर सानेकर Chandrashekhar Sanekar
Music - अजय-अतुल Ajay-Atul,
Singer -स्वप्नील बांदोडकर Swapnil Bandodkar
Movie / Natak / Album - बेधुंद Bedhund

No comments:
Post a Comment