अवघाचि संसार AWGHACHI SANSAR





बहरुन ये अणुअणू
बहरुन ये अणुअणू
जाहली रोमांचित ही तनू

नकळत मिळता नजरा दोन्ही
लहरत गेली वीज नसांतुनी
गेले, बाई, मी बावरुनी
किमया घडली जणू

उमलुन आली रात्र चांदणी
गंध दरवळे फुलांवाचुनी
अंगांगावर लहर चंदनी
सुख लागे रुणुझुणू

दंवापरी ते सुख टपटपले
ओठांनी या अलगद टिपले
आजवरी जे हृदयी जपले
तेच लाभले जणू

Lyrics -डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare
Music वसंत पवार  Vasant Pawar.
Singer आशा भोसले-Aasha Bhosle
Movie / Natak / Album -AWGHACHI SANSAR 

No comments:

Post a Comment