दूर देशी राहिलेले दीन त्याचे झोपडे
बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे !
शोधण्याला भाकरीचा घास आला योजने
आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे !
( लाज झाकाया कटीला लावलेली लक्तरे
अन् धुळीने माखलेले, तापलेले, कातडे !
आर्त डोळ्यांतून सारी आटलेली आसवें
आत दावाग्नीच पेटे, ओढ घेई आतडे !
झाकल्या डोळ्यांस होती भास, दोही लेकरें
हात घालोनी गळ्याला ओढती खोप्याकडे !
नादला झंकार कानीं कंकणांचा कोठुनी
काळजाला तो ध्वनी भिंगापरी पाडी तडे ! )
भोवतीचे उंच वाडे क्रूरतेने हासती
मत्त शेजारून कोठे आगगाडी ओरडे !
आणि चक्रे चालली ती- हो महाली गल्बला
चालला हो प्राण त्याचा.. पापणी खाली पडे !
थांबल्या त्या हालचाली, थांबले काळीज हो
आणि माशांचा थवा मुद्रेवरुनी बागडे !
( ना भुकेचा यापुढे आक्रोश पोटी चालणे
याचनेचे दीन डोळे बंद झाले यापुढे !
यापुढे ना स्वाभिमाना लागणे आता चुडा
अंतराला आसुडाचे घाव, माथी जोखडे ! )
मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा
तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !
मूक झालेल्या मुखाने गर्जते का प्रेत हे
घालिती हे बंद डोळे का निखार्याचे सडे !
अन् अजुनी हासती उन्मत्त हो प्रासाद ते
वेग-वेड्या वाहनांचा घोष ये चोहिकडे !
भेकडांनो, या इथे ही साधण्याला पर्वणी
पेटवा येथे मशाली अन् झडू द्या चौघडे !
बापुडा अन् आज येथे पायवाटेला पडे !
शोधण्याला भाकरीचा घास आला योजने
आणि अंती मृत्यूच्या घासात वेडा सापडे !
( लाज झाकाया कटीला लावलेली लक्तरे
अन् धुळीने माखलेले, तापलेले, कातडे !
आर्त डोळ्यांतून सारी आटलेली आसवें
आत दावाग्नीच पेटे, ओढ घेई आतडे !
झाकल्या डोळ्यांस होती भास, दोही लेकरें
हात घालोनी गळ्याला ओढती खोप्याकडे !
नादला झंकार कानीं कंकणांचा कोठुनी
काळजाला तो ध्वनी भिंगापरी पाडी तडे ! )
भोवतीचे उंच वाडे क्रूरतेने हासती
मत्त शेजारून कोठे आगगाडी ओरडे !
आणि चक्रे चालली ती- हो महाली गल्बला
चालला हो प्राण त्याचा.. पापणी खाली पडे !
थांबल्या त्या हालचाली, थांबले काळीज हो
आणि माशांचा थवा मुद्रेवरुनी बागडे !
( ना भुकेचा यापुढे आक्रोश पोटी चालणे
याचनेचे दीन डोळे बंद झाले यापुढे !
यापुढे ना स्वाभिमाना लागणे आता चुडा
अंतराला आसुडाचे घाव, माथी जोखडे ! )
मानवांच्या संस्कृतीची काय लागे ही ध्वजा
तीस कोटी दैवतांच्या की दयेचे हे मढे !
मूक झालेल्या मुखाने गर्जते का प्रेत हे
घालिती हे बंद डोळे का निखार्याचे सडे !
अन् अजुनी हासती उन्मत्त हो प्रासाद ते
वेग-वेड्या वाहनांचा घोष ये चोहिकडे !
भेकडांनो, या इथे ही साधण्याला पर्वणी
पेटवा येथे मशाली अन् झडू द्या चौघडे !
No comments:
Post a Comment