प्रिये ये निघोनी
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे
असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधून नेते
कधी मुक्तता हे कुणाला न ठावे
सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कधी घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देऊन येतो
असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे न वाहे ऊरातून श्वास
ऊरा-अंतरातून यांत्रीकतेने
फिरे फक्त वारा किंवा तोही भास
दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतु तयांच्या
नशीबी कसे सांग तुजला पहाणे
असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सगळ्यात यात
मिठीतून देईन सगळा पुरावा
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे
असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे
परंतू मला वेळ बांधून नेते
कधी मुक्तता हे कुणाला न ठावे
सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो
न देई कधी घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देऊन येतो
असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे न वाहे ऊरातून श्वास
ऊरा-अंतरातून यांत्रीकतेने
फिरे फक्त वारा किंवा तोही भास
दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे
मला तू न दिसशी परंतु तयांच्या
नशीबी कसे सांग तुजला पहाणे
असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी.. तुझ्याशी दुरावा
किती फाटतो जीव सगळ्यात यात
मिठीतून देईन सगळा पुरावा
प्रिये ये निघोनी घनांच्या कडेनी
मला एकटेसे अता वाटताहे
No comments:
Post a Comment