सुख आले माझ्या दारी,Sukha Aale Majhya Dari

सुख आले माझ्या दारी
मज काय कमी या संसारी ?

तो स्वर्ग नको मज, नकोच ती पुण्याई
हे भाग्य पुरे की मी बाळाची आई
माझ्या पुरती ही इंद्रपुरी

आलासि घरी तू उजळे घर लडिवाळा
तू संसारा या अर्थ लाविता बाळा
भाग्यवती मी खरोखरी

नयनांत तुझ्या मी बघते स्वप्न उद्याचे
या इवल्या हाती लपले दिन भाग्याचे
बाळगिली ही आस उरी

No comments:

Post a Comment