उभा पाठिशी सदैव माझ्या तेजोमय इतिहास
उभे पाठिशी प्रताप, शिवबा, उभे शौर्य विश्वास
उभे पाठिशी भगतसिंगजी, उभे गुरूगोविंद
उभा पाठिशी सुभाष योद्धा, गर्जतसे जयहिंद
या देशाचा मी संरक्षक, भारत माझे गाव
सैनिक माझे नाव
मी न मराठी, राजस्थानी, धर्म जाति मज हिंदुस्थानी
मायभूमिचा मी अभिमानी, या अभिमानी धर्मव्रतांचा-
अवघा अंतर्भाव
जननी माझी भारतमाता, या भूमीतच पिके वीरता
जन्म-मृत्युची मला न चिंता, देह विनाशी हा तर केवळ
आत्म्याचा पेहेराव
जितेन आणि जगेन लोकी, रण क्रीडांगण माझ्या लेखी
खड्ग पडे की मुकुट मस्तकी, देशकार्य ते देवकार्य मज
अढळ अंतरी भाव
उरि निर्भयता, नयनी अग्नी, उन्नत मस्तक करी शतधनी
उभा इथे मी असा निशिदिनी, बघू कोणता शत्रू करतो,
कुठुनी धीट उठाव

No comments:
Post a Comment