हसले फसले हरवून मला,Hasale Phasale Harvun Mala

हसले, फसले, हरवून मला मी बसले

कळी मी अबोल होते, वारा लबाड आला
मी अंग चोरीले ग, हळुवार स्पर्ष झाला
क्षण ते दंवात विझले

देठातुनी फुलावे, हितगूज एक ओले
कुजबूज पाकळ्यांची, गंधास रंग बोले
सारे मनात ठसले

वेलीवरी धुक्याचा, उठता नवा शहारा
स्वप्नात जागले मी, छेडीत चंद्र तारा
स्वर ते अबोध कसले

ओशाळल्या मनाला, जाणीव आज लाजे
मजला मिळून सारे, काही न आज माझे
म्हणुनी उगाच रुसले

No comments:

Post a Comment