विनायका स्वीकार वंदना,Vinayaka Sweekar Vandana

विनायका स्वीकार वंदना
तुझीच पूजा तुझी प्रार्थना

सहस्त्र नामे भरुनी राहिला
संकष्टी हा भरुनी पावला
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना

तव मातेचे आत्मरूप तू
ओंकाराचे पूर्ण रूप तू
वंदनीय तू गौरीनंदना
विनायका स्वीकार वंदना

शुद्धी-बुद्धी सकलजनांना
आत्मशक्ती मना-मनांना
सांभाळी रे भक्तजनांना
विनायका स्वीकार वंदना

No comments:

Post a Comment