शंभो शंकरा करुणाकरा,Shambho Shankara

शंभो, शंकरा, करुणाकरा, जग जागवा !

अंधार हा लोपवा
द्यावा प्रकाश नवा
चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा, हे शिवा !

सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !
हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !

संमार्जिली अंगणे
पान्हावली गोधने
आसावला आसमंत अमृताने चिंब नाहवा, हे शिवा !

सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !
हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !

तू आपदा वारणारा
तू दु:खिता तारणारा
होई कृपावंत, विश्वातले आर्त, अभयंकरा शांतवा, हे शिवा !

सांब सदाशिव हे त्रिपुरारी, शंभो !
हे भवतारक दु:ख निवारी, शंभो !

No comments:

Post a Comment