सजणी ग भुललो मी,Sajani Ga Bholalo Mi

सजणी ग, भुललो मी काय जादू झाली
बगून तुला जीव माझा होई वर खाली

सजणा रं काय सांगू कुणी जादू केली
लाज मला आली बाई लाज मला आली

काल मला ह्याची बाई जाण नव्हती
आज कशी मोहरून आली नवती

अंग चोरतीया कशी लाजाळूची येली
अल्लड चाळ्याची खोडी कुठं गेली
लाज मला आली बाई लाज मला आली

लपं ना ही हुरहुर आज पदरी
शालू चोळी नेसूनी मी झाले नवरी

काया जणू गरतीचं लेणं आज ल्याली
येशील का घरी तू लक्ष्मीच्या चाली
लाज मला आली बाई लाज मला आली

No comments:

Post a Comment